Pramod Mahajan Unleashes Innovation with PMKUVA: A Game-Changer for Entrepreneurship

Pramod Mahajan Unleashes Innovation with PMKUVA: A Game-Changer for Entrepreneurship

 प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान (PMKUVA)

शासन निर्णय क्र.: कौविउ-२०१५/प्र.क्र.१२२/रोस्वरो-१, दिनांक 02 सप्टेंबर 2015

योजनेचा प्रकार: राज्यातील युवक-युवतींना विविध क्षेत्रामधील कौशल्य प्रशिक्षण देणे

योजनेचा उद्देश:

  1. राज्यातील सर्व इच्छुक उमेदवारांना त्यांच्या रुचीच्या क्षेत्रात कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना अधिक मागणी असलेल्या उद्योग, सेवा व तत्सम क्षेत्रात रोजगार/स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.

  2. राष्ट्रीय पातळीवर रोजगाराची अधिकतम संधी असलेली खालील 11 क्षेत्रे कौशल्य विकासासाठी प्राधान्य क्षेत्रे म्हणून निवडण्यात आली आहेत:

    • बांधकाम (Construction)
    • उत्पादन व निर्माण (Manufacturing & Production)
    • वस्त्रोद्योग (Textile)
    • आटोमोटीव (Automobile)
    • आतिथ्य (Hospitality)
    • आरोग्य देखभाल (Healthcare)
    • बँकिंग, वित्त व विमा (Banking, Finance & Insurance)
    • संघटीत किरकोळ विक्री (Organized retail)
    • औषधोत्पादन व रसायने (Pharmaceutical & Chemicals)
    • माहिती तंत्रज्ञान व सलग्न (IT and ITes)
    • कृषी प्रक्रिया (Agro Processing)
  3. वरील 11 प्राधान्याची क्षेत्रे, तसेच इतर अन्य महत्वाची क्षेत्रे जसे की कृषी, जेम्स आणि ज्वेलरी, अश्या अनेक क्षेत्रांमध्ये राज्यातील उमेदवारांना प्रशिक्षित करून त्यांचे सक्षमीकरण करणे.

योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव: सदरील योजना सर्व प्रवर्गासाठी लागू आहे.

योजनेच्या प्रमुख अटी: 15 ते 45 वयोमान्याच्या कोणत्याही व्यक्तीस कोणत्याही क्षेत्राचे कौशल्य धारण करण्याकरीता महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी (MSSDS) कडे संबंधीत प्रशिक्षण पुरविणाऱ्या सूचीमध्ये अर्ज करून प्रशिक्षण मिळविता येते. सदर प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी MSSDS च्या संकेत स्थळावर सूचीबद्ध करण्यात आलेल्या प्रशिक्षण संस्थांची यादी उपलब्ध आहे. तसेच आवश्यक असलेल्या अन्य अटी, शर्ती आणि नियमांची माहिती उपलब्ध आहे.

आवश्यक कागदपत्रे: आधारकार्ड व ऐच्छिक प्रशिक्षणा करीता लागणारी किमान शैक्षणिक अर्हता धारण केले असल्या संबंधीचे सर्व प्रमाणपत्रे.

दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप: प्रत्येक लाभार्थ्याला देण्यात येणा-या प्रशिक्षणावर होणा-या खर्चाची पूर्तता राज्य शासनामार्फत केली जाते.

अर्ज करण्याची पद्धत: इच्छुक उमेदवाराने महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी (MSSDS) च्या संकेतस्थळा वरून, पाहिजे त्या क्षेत्रातील प्रशिक्षण देणा-या संस्थांच्या यादीमधून, संबंधीत संस्थेकडे संपर्क करणे आवश्यक आहे.

अंदाजे प्रक्रियेला लागणारा वेळ: महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी कडे (MSSDS) सूचीबद्ध असलेल्या प्रशिक्षण संस्थांकडे अर्ज केल्यावर त्या संस्थेकडून सदर प्रशिक्षण सुरू करण्यात येणा-या पुढील तुकडीत समावेश करण्यात येईल.

संपर्क कार्यालाचे नाव व पत्ता: महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, 4 मजला, एम.टी.एन.एल. बिल्डींग, जी. डी. सोमानी मार्ग, कफ परेड, मुंबई 400 005.

Online अर्ज करण्याचे संकेतस्थळ: www.mssds.in

या योजनेच्या माध्यमातून, महाराष्ट्रातील युवा आणि युवतींना कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधींची मदत करण्यात आपल्याला मदतीची संधी मिळू शकते.

Next Post Previous Post