३० लाख वृक्षारोपणाचा संकल्प: हरित बीडसाठी एक पाऊल पुढे!
🌱 ३० लाख वृक्षारोपणाचा संकल्प: हरित बीडसाठी एक पाऊल पुढे!
"झाडे लावा, पर्यावरण वाचवा" या संकल्पासाठी QR कोड स्कॅन करून नोंदणी करा.
🌿 QR कोडद्वारे झाड लागवड नोंदणी कशी करावी?
१. मोबाईलमधील इंटरनेट सुरु करा
नोंदणी करण्यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये इंटरनेट कनेक्शन चालू असणे आवश्यक आहे. मोबाईल डेटा किंवा Wi-Fi सुरु करा.

२. GPS/लोकेशन ऑन करा
झाड नोंदणी करताना अचूक लोकेशन मिळण्यासाठी GPS किंवा लोकेशन सर्व्हिसेस सुरु असणे गरजेचे आहे.

३. QR कोड स्कॅन करा
QR कोड स्कॅन करण्यासाठी तुम्ही गुगल लेंस, मोबाईल कॅमेरा किंवा QR स्कॅनर अॅपचा वापर करू शकता.

४. लिंकवर क्लिक करा
QR कोड स्कॅन केल्यानंतर स्क्रीनवर एक लिंक दिसेल. त्या लिंकवर क्लिक करून नोंदणी फॉर्म उघडा.

५. नोंदणी यशस्वी!
फॉर्म भरल्यानंतर "नोंदणी पूर्ण झाली" असा संदेश दिसेल. याचा अर्थ तुमची नोंदणी यशस्वी झाली आहे.